भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागणें तें आह्मा नाहीं हो कोणासी । आठवावें संतासी हेंचि खरें

maganen ten ahma nahin ho konasi | athavaven santasi henchi kharen

रचनाकार: संत सावता · अभंग
मागणें तें आह्मा नाहीं हो कोणासी । आठवावें संतासी हेंचि खरें ॥ १ ॥ पूर्ण भक्त आह्मां ते भक्ती दाविती । घडावी संगती तयाशींच ॥ २ ॥ सावता म्हणे कृपा करी नारायणा । देव तोचि जाणा असे मग ॥ ३ ॥