भजनी मालिका
← भजनांकडे परत

कीर्तनासी जातां मागी टाकी पाय अमर देह होय कळे त्यासी

kirtanasi jatan magi taki pay amar deh hoy kale tyasi

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
कीर्तनासी जातां मागी टाकी पाय अमर देह होय कळे त्यासी ॥१॥ ओखद तरी तेथे घड़े हिंसा जन्मवेद भाषा वेदापाशीं ॥ २॥ गंगा वाराणसी धरोनि पदरी चाललीसे नारी दोहींकडे ||३|| आमच्या बापाची ऐकावया कीर्ति जाऊं म्हणोन घेतीं ऐक्य कथीं ||४|| कीर्तनासी जावें कैसें कोणेपरी असूं द्या अंतरी गोष्ट हित ॥५॥ बन्हाडी धांवे जैसा प्रयोजनीं तान्हेलें तें पाणी पुसावया। ॥६॥ व्याकुळ तें एक चुकलें बाळक । त्या धांवे शोक हांका मारी ||७|| अशी कथे जातां गंगा त्या चरणीं । म्हणे दासी जनी भाक मानी ॥८॥