भजनी मालिका
← भजनांकडे परत

कनवाळ कृपाळ । उदार दयाळ मायाळ

kanaval krupal | udar dayal mayal

कनवाळ कृपाळ । उदार दयाळ मायाळ । म्हणवितोसी परि केवळ । गळेकाटु दिसतोसी ॥१॥ काय केलें होतें आम्हीं । सांग तुझें एक ये जन्मीं । जालासी जो स्वामी । एवढी सत्ता करावया ॥२॥ भलेपणाचा पवाडा । बरा दाविला रोकडा । करूनी बंधु वेडा । जोडा माझा विखंडिला ॥३॥ तुकया बंधु म्हणे भला । कैसें म्हणताती तुजला । जीव आमुचा नेला । अंत पाहिला कांहीं तरी ॥४॥