भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्यांचे घेतां मुखीं नाम

jyanche ghetan mukhin nam

ज्यांचे घेतां मुखीं नाम । धाकीं पडे काळ यम ।।१।। ऐशी नामाची थोरी । उद्धारिले दुराचारी ।। २ ।। नष्ट गणिका आजामेळा । वाल्मिकी झाला तो सोज्वळ ।। ३ ।। ऐशी नाम माळा । कान्होपात्रा ल्याली गळा।।४।।