भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी

jyacha sakha hari tyavari vishva krupa kari

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी ।।१।। उणेंपडोंनेदीत्याचेंवारेंसोसीआघाताचें||२|| तयावीणक्षणभरी । कदाआपणनव्हेदुरी||३|| आंगा आपुले ओडोनी । त्याला राखे जो निर्वाणीं ॥४॥ ऐसा अंकित भक्तांसी । म्हणे नामयाची दासी ॥५॥