भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्याचा नोहे भंग तोची जाणावा अभंग

jyacha nohe bhang tochi janava abhang

रचनाकार: संत संताजी · अभंग
ज्याचा नोहे भंग तोची जाणावा अभंग । देह आपुला भंगतो माति मिळोनिया जातो ।।१।। त्याचे होईनाच काही अंतरी शोधुनिया पाही । प्राण जातो यमपाशी दुःख होते ते मायेशी ।।२।। संतु म्हणे असा अंभग गाइला । पुढे चालु केला देहावरी ।।३।।