भजनी मालिका
← भजनांकडे परत

जोड झाली रे शिवासी प्रांत फिटली जिवाची

jod jhali re shivasi prant phitali jivachi

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
जोड झाली रे शिवासी प्रांत फिटली जिवाची ।।१।। आनंदची आनंदला आनंद बोधसि बोधला ॥२॥ आनंदाची लहरी उठी। ब्रह्मानंदे गिळिला पोटीं ||३|| एकपण जेथें पाहीं । तेथें विज्ञप्ति उरली नाहीं ||४|| ऐसी सद्गुरूची करणी दासी जनी विठ्ठल चरणीं ।।५।।