भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन्मलो मी कुठे सांगतां नये कांही

janmalo mi kuthe sangatan naye kanhi

रचनाकार: संत संताजी · अभंग
जन्मलो मी कुठे सांगतां नये कांही । निरंजन निराकार आधार नव्हता ठाई ।।१।। तेथे मी जन्मलो शोधुनिया पाही । जन्मले माझे कुळ आशेच सर्वही ।।२।। असाच हा जन्म पाठी मागा गेला । पुन्हा नाही आला कदा काळी ।।३।। संतु म्हणे वनमाळी । चुकवा जन्माची हे पाळी ।।४।।