भजनी मालिका
← भजनांकडे परत

होवोनिया जगी योगिया शरण

hovoniya jagi yogiya sharan

रचनाकार: संत जनार्दन · अभंग
होवोनिया जगी योगिया शरण । करो नये अन्य गुरु मग ॥१॥ घेतां आणिकांचा चुकोनीही मंत्र । बुडोनी परत्र पतन होय ॥२॥ जाती ते दोघेही पतनी अक्षय । आकल्प उभय कुळासह ॥३॥ न होती तयांसी तारु हरी हर । मोगिती अघोर पुर्वजेशी ॥४॥ राजयोगी दावी निर्वानीचे सुख । योगीची तारक ब्रह्मादाता ॥५॥ म्हणो नये गुरुसी मायबाप बंधु । आप्त मित्र संबंधु लौकिक हा ॥६॥ माय बाप पतीनव्हती कोण एक । निर्वाणि तारक सदगुरुची ॥७॥ नाहीं गुरुवीण देवासीही ब्रह्मा । मजावा सप्रेम ब्रह्माभावें ॥८॥ म्हणे जनार्दन ब्रह्मभावे दाठी । उघडी भ्रमताटी एकनाथ ॥९॥