भजनी मालिका
← भजनांकडे परत

हेचि गुह्मा ज्ञान सांगितलें मज

hechi guhma dnyan sangitalen maj

रचनाकार: संत जनार्दन · अभंग
हेचि गुह्मा ज्ञान सांगितलें मज । तेणे मी सहज मीची झालों ॥१॥ हेचि मत्स्येंदासी ज्ञान आदिनाथें । कथिलें निवृत्तीनाथें ज्ञानदेवा ॥२॥ तेथुनी हें संती रुढली परंपरा । आदिनाथ गुरु संप्रदायीं ॥३॥ सोळा अभंगाचा लिहुनी प्रबंध । गोदा तटी सिद्ध संत मेळी ॥४॥ उद्धाराया विश्वा धाडिला पैठणीं । उरलें याहोनी नाहीं आतां ॥५॥ येथुनी उपदेश झाला सांग पूर्ण । तारक हे ज्ञान सेवो विश्व ॥६॥ म्हणे जनार्दन वचन बांधी गांठीं । उघडी भ्रमताटी एकनाथा ॥७॥