भजनी मालिका
← भजनांकडे परत

गंगा गेली सिंधूपाशी त्याणें अव्हेरिलें तिसी

ganga geli sindhupashi tyanen avherilen tisi

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
गंगा गेली सिंधूपाशी त्याणें अव्हेरिलें तिसी ॥१॥ तरी ते सांगावें कवणाला ऐसें बोलें बा विठ्ठला ॥२॥ जळ कोपे जळचरा माता अव्हेरी लेकुरा ॥३॥ जनी म्हणे शरण आलें। अव्हेरितां ब्रीद गेलें ॥४॥