भजनी मालिका
← भजनांकडे परत

द्वारकेच्या राया। बुद्धि दे गा नाम गाया

dvarakechya raya| buddhi de ga nam gaya

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
द्वारकेच्या राया। बुद्धि दे गा नाम गाया ।।१।। मतिमंद तुझी दासी ठाव देई चरणांपासीं ॥२॥ तुझे पदरीं पडलें खरी। आतां सांभाळ करी हरी ॥३॥ न कळे हरीची करणी म्हणे नामयाची जनी ॥४॥