भजनी मालिका
← भजनांकडे परत

दूत विनविती कर जोडुनी । म्हणती आरुढावें विमानीं

dut vinaviti kar joduni | mhanati arudhaven vimanin

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
दूत विनविती कर जोडुनी । म्हणती आरुढावें विमानीं । । १ ।। ऋषि म्हणे न घडे ऐसें । ह्याची तृप्ति नाहीं आस ।। २ ।। टपावरोनी काढिला पटीं बैसवीन ह्याला ||३|| थोर वाजत गाजत विप्र मंत्रघोष करीत ।।४।। विजयी झाला हरिश्चंद्र आडवा पावला परिवार ।।५ लक्षानुलक्ष आरत्या करिती । नगरनारी वोवाळिती ।।६।। ऋषि अभिषेकिती रायाला थोर मनीं आनंदला ॥७॥ राया प्राप्ती जाला पट। गुडी उभवी वसिष्ठ ||८|| येथुनी हरिश्चंद्र आख्यान । नामयाची जनी म्हणे ॥ ९ ॥