भजनी मालिका
← भजनांकडे परत

दुःखें दुभांगलें हृदयसंपुष्ट

duhkhen dubhangalen hrudayasampushta

दुःखें दुभांगलें हृदयसंपुष्ट । गहिवरें कंठ दाटताहे ॥१॥ ऐसें काय केलें सुमित्रा सखया । दिलें टकोनियां वनामाजी ॥२॥ आक्रंदती बाळें करुणावचनीं । त्या शोकें मेदिनी फुटों पाहे ॥३॥ काय हें सामर्थ्य नव्हते तुजपाशीं । संगें न्यावयासी अंगभूतां ॥४॥ तुज ठावें आम्हां कोणी नाहीं सखा । उभयलोकीं तुका तुजविण ॥५॥ कान्हा म्हणे तुझ्या वियोगें पोरटीं । जालों दे रे भेटी बंधुराया ॥६॥