भजनी मालिका
← भजनांकडे परत

दीन पतित अन्यायी

din patit anyayi

दीन पतित अन्यायी । शरण आले विठाबाई ।। १ ।। मी तो आहे यातीहीन । न कळे काही आचरण ।। २ ।। मज अधिकार नाही । शरण आले विठाबाई ।। ३ ।। ठाव देई चरणापाशी | तुझी कान्होपात्रा दासी ।।४।।