भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य ज्याचे चरणीं गंगाओध झाला मस्तकीं धरिला उमाकांतें

dhanya jyache charanin gangaodh jhala mastakin dharila umakanten

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
धन्य ज्याचे चरणीं गंगाओध झाला मस्तकीं धरिला उमाकांतें ॥१॥ धुंडितां ते पाय शिणला तो ब्रह्मा। बोल ठेवीं कर्मा आपुलीया ॥ २॥ शुक सनकादिक फिरती हरिजन नारदादि गाणें जयासाठीं ॥३॥ ते चरण आम्हांसी गवसले अनावासी धन्य झाली दासी जनी म्हणे ||४||