भजनी मालिका
← भजनांकडे परत

धन्य धन्य संतु होशिल तूं जाण

dhanya dhanya santu hoshil tun jan

रचनाकार: संत संताजी · अभंग
धन्य धन्य संतु होशिल तूं जाण । तुजलागी ज्ञान फार आहे ।। व्यर्थ तुझी निंदा करिताती लोक। मजलागी देख कळो आलेँ ।। ज्ञानाचा सागर होशील तूं योगी। नेणती हेँ जगीँ मूढ जन ।। तुका म्हणे बोल अंतरीचे ज्ञान। ऐकतां वचन गोड लागे ।।