भजनी मालिका
← भजनांकडे परत

देव भावाचा लंपट सोडुनी आला हो वैकुंठ

dev bhavacha lampat soduni ala ho vaikunth

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
देव भावाचा लंपट सोडुनी आला हो वैकुंठ ।।१।। पुंडलिकापुढे उभा सम चरणांवरी शोभा ॥२॥ हात चक्र पायीं वांकी। मुख भक्ताचें अवलोकीं ।। ३॥ उभा बैसे न सर्वथा । पाहे कोठे भक्तकथा ||४|| सर्वसुखाचा सागर । जनी म्हणे शारंगधर ||५||