भजनी मालिका
← भजनांकडे परत

देहभाव प्राण जाय। तेव्हां हें धैर्य सुख होय

dehabhav pran jay| tevhan hen dhairya sukh hoy

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
देहभाव प्राण जाय। तेव्हां हें धैर्य सुख होय ||१|| तया निद्रे जे निजले गाव जागृती नाहीं आले || २ || ऐसी विश्रांति लाधली । आनंद कळा संचरली ||३|| तेथें सर्वांग सुखीं झालें लिंग देह विसरलें ||४|| त्या एकी एक होता दासी जनी नाहीं आतां ॥५॥