भजनी मालिका
← भजनांकडे परत

देह क्षेञ घाणा ऐका त्याच्या खुणा

deh kshen ghana aika tyachya khuna

रचनाकार: संत संताजी · अभंग
देह क्षेञ घाणा ऐका त्याच्या खुणा । गुदस्थान जाणा उखळ ते ।।१।। स्वाधिष्टानावरी मन पुरचक्र । विदुं दंत चक्र आनु हात ।।२।। एकविस मनी खांब जो रोविला । सुतार तो भला विश्वकर्मा ।।३।। मनाशी जुपंले फेरे खाऊ दिले । तेल हाता आले सुटे मन ।।४।। संतु म्हणे माझा घाणा हो देहांत । चालवि आपोआप पांडुरगं ।।५।।