भजनी मालिका
← भजनांकडे परत

भक्तीसाठी याति नाहीं नाहीं तयासी ते सोई

bhaktisathi yati nahin nahin tayasi te soi

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
भक्तीसाठी याति नाहीं नाहीं तयासी ते सोई।।१।। रोहिदास तो चांभार त्याचा करी कारभार ॥२॥ जो कां भक्त यातिहीन देव करी त्याचा मान ॥३॥ त्यासी भक्ताचा आधार वाट पाहे निरंतर ॥४॥ जनी म्हणे भक्तासाठी विठो सदा गोण्या लोटी॥५॥