भजनी मालिका
← भजनांकडे परत

बांधोनियां हात गयावळ मारिती। दंड ते करिती मोक्षासाठीं

bandhoniyan hat gayaval mariti| dand te kariti mokshasathin

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
बांधोनियां हात गयावळ मारिती। दंड ते करिती मोक्षासाठीं ।।१।। गेले ते पितर मोक्षालागीं तुझे। आतां देई माझे दक्षिणेसी ॥२॥ बापुडें कॅश बोडिती मिशी दाढी मग दक्षणा हिरडी खातसे हे ।।३।। फार काय सांगू मेल्याविण मुक्ती नाहीं ते वांछित स्वप्नख ॥४॥ अनंत जन्म मृत्यु होता जैसे दुःख त्याहून अशेष आहे तेथें ॥५॥ भांबावले जन धांवे आटाआटी सोडूनियां कोटि अनंत पद ॥६॥ नलगे गाळावें नलगे तळावें । नलगे मरावें मुक्तीसाठीं ॥७॥ मुक्ति लागे पायां जाऊनियां पाहे जीव जातां देह जनी नाहीं ||८||