भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहु बोलणें नये कामा । वाउगें तें पुरुषोत्तमा

bahu bolanen naye kama | vaugen ten purushottama

बहु बोलणें नये कामा । वाउगें तें पुरुषोत्तमा । एकाचि वचनें आम्हां । काय सांगणें तें सांग ॥१॥ देणें आहे कीं भंडाई । करणें आहे सांग भाई । आतां भीड कांहीं । कोणी न धरी सर्वथा ॥२॥ मागें गेलें जें हो‍ऊनी । असो ते धरित नाहीं मनीं । आतां पुढें येथूनी । कैसा काय विचार ॥३॥ सारखी नाहीं अवघी वेळ । हें तों कळतें सकळ । तुकयाबंधु म्हणे खळखळ । करावी ते उरेल ॥४॥