भजनी मालिका
← भजनांकडे परत

आशिच ही शिळा होते कोठेँ कोठेँ

ashich hi shila hote kothen kothen

रचनाकार: संत संताजी · अभंग
आशिच ही शिळा होते कोठेँ कोठेँ । अहिल्या आणि गोरोबाचे येथेँ ।। आणिक कंसाचे दारी होती शिळा । आपटि तिजवरी कृष्णाजिचेँ कुळा ।। संतु म्हणे तुम्ही ध्यानीं धरा शिळा । उध्दाराया कुळा आपुलिया ।।