भजनी मालिका
← भजनांकडे परत

आषाढी एकादशी। नामा होता उपवासी

ashadhi ekadashi| nama hota upavasi

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
आषाढी एकादशी। नामा होता उपवासी।।१।। देवें गरुडा धाडिला । वेगीं बोलाविलें त्याला ॥२॥ राही म्हणे पांडुरंगा। कोणा बोलाविलें सांगा ||३|| माझ्या जीवींचें जीवन त्यासी बोलाविलें जाण ॥४॥ ऐसा भक्तराज निका । दासी जनीचा आत्मसखा ॥५॥