भजनी मालिका
← भजनांकडे परत

आशा मनशा तृषा माया पाचरी चारी आणून

asha manasha trusha maya pachari chari anun

रचनाकार: संत संताजी · अभंग
आशा मनशा तृषा माया पाचरी चारी आणून । दुर्गतीचा खील त्यामधी दीला ठोकून ।।१।। त्याच्या योगे चारी पाचरी आल्या आवळून । सरकायासी जागा नाही मुळापासून ।।२।। संतु म्हणे ह्या घाण्याच्या पाचरी । जग भुलव्या नारी खय्राच ह्या ।।३।।