भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमुचा तो घाणा ञिगुण तिळाचा

amucha to ghana nigun tilacha

रचनाकार: संत संताजी · अभंग
आमुचा तो घाणा ञिगुण तिळाचा । नंदी जोडियला मन पवनाचा ।।१।। भक्ति हो भावाची लाट टाकियली । शांती शिळा ठेवीली विवेकावरी ।।२।। सुबुध्दीची वढ लावोनी विवेकांस । प्रपंच जोखड खांदी घेतीयले ।।३।। फेरे फिरो दिले जन्मवरी । तेल काढियले चैतन्य ते ।।४।। संतु म्हणे मी हे तेल काढियले । म्हणुनी नांव दिल संतु तेली ।।५।।