भजनी मालिका
← भजनांकडे परत

आले वैष्णवांचे भार दिले हरिनाम नगार

ale vaishnavanche bhar dile harinam nagar

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
आले वैष्णवांचे भार दिले हरिनाम नगार।।१।। अवघी दुमदुमली पंढरी। कडकडाट गरुडपारीं ॥२॥ टाळ मृदंग धुमाळी रंगणी नाचे वनमाळी ||३|| ऐसा आनंद सोहळा दासी जनीं चाहे डोळां ॥४