भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसें क्रमितां अवधारीं । विश्वेश्वराचे नगरीं

aisen kramitan avadharin | vishveshvarache nagarin

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
ऐसें क्रमितां अवधारीं । विश्वेश्वराचे नगरीं ।। १ ।। देखियेली वाराणसी। थोर आनंद मानसीं ॥२॥ म्हणती घ्यावें शिवदर्शन। तेणें श्रम निवारण ।।३।। बाप येऊनि चौबारा उभा धरूनि पदरा ||४|| म्हणे कोठें रे दक्षणा बरा होसी चुकवणा॥५॥ जो कां राजा सूर्यवंशीं छत्र चामर जयासी ॥६॥ माथां बांधोनियां तृण पाली विक्रया आपण ॥७॥ राणी म्हणे प्राणेश्वरा आर्थी विक्रा माझाकरा ॥१८॥ रोहिदास कर जोडुनी चरणीं मस्तक ठेवुनी ||१|| आर्थी विक्रा माझिया द्रव्यासी। तुम्हीं द्यावें कौशिकासी ॥१०॥ ऐसें दोघांचें उत्तर नवल करी ऋषीश्वर ।।११।। काय करा याच्या बोला। म्हणे वजनी सोनें घाला ।।१२।। अग्रिहोत्री तो ब्राह्मण उभा रायायें येऊन ।।१३।। देई तारामती तुक। एक भार हा कनक ।।१४।। रोहिदास म्हणे ताता। माता स्नेह माझ्या चित्ता।।१५।। राव बोलिला वचन। शीघ्र यावें वा भेटोन ।। १६ ।। उभी राहोनी वेल्हाळा पोटीं बाळाचा उमाळा ।।१७।। अश्रु ढाळिती लोचन हा हा शब्द करी रुदन।।१८।। बोले कौशिक ये माते । स्नेह सोड चाल पंथें ॥१९॥ करूनियां ताडातोडी पाहे कवतुक आवडी ।।२०।। माता म्हणे बाळकासी ममता असूं दे मजपाशीं ।। २१ ।। रोहिदास ताराराणी। तेही घेतली ब्राह्मणीं ।। २२ ।। मोल देऊनियां दुणें राव घेतला डोंबानें ॥ २३॥ घेऊनियां घरा आला येऊन सांगतो भायेंला ||२४|| सेवक आणिला तुम्हांसी सेवा घ्यावी आवडेल तैसी।।२५।। घागर घेऊनियां हातीं । पाणी आणी शीघ्र गति ।।२६।। कुंभ घेऊनि चालिला खडा हाणोनि फोडिला ॥२७॥ रिक्तपाणी येतां त्यासी । अवधे धुमिसिती रायासी ।।२८।। हा तो पहिलाच शकून पुढें येणें काय करण ।। २९।। म्हणती हा तो नव्हे भला। यासी ठेवा स्मशानाला ||३०|| राव रक्षी स्मशानासी म्हणे नामयाची दासी ।। ३१ ।।