भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसा योग घडे ज्यातें धन्य माता आणि तात

aisa yog ghade jyaten dhanya mata ani tat

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
ऐसा योग घडे ज्यातें धन्य माता आणि तात ।।१।। अखंड वासना। ब्रह्मार्पण देवार्चना ||२|| ब्रह्मभावें हो देवा । ऐसा पूजी जो भूदेवा ।।३।। नम्रता चरणीं । म्हणे जनी सरली मनीं ॥४॥