भजनी मालिका
← भजनांकडे परत

योगियांचा देव मज सांपडला

yogiyancha dev maj sampadala

रचनाकार: संत रामदास · अभंग
योगियांचा देव मज सांपडला। थोर लाभ जाला एकाएकीं एकाएकीं एक त्रैलोक्यनायक । देखिला सन्मूख चहुंकडे चहुंकडे देव नित्यनिरंतर । व्यापुनी अंतर समागमें समागम मज रामाचा जोडला । वियोग हा केला देशधडी देशधडी केला विवेके वियोग । रामदासीं योग सर्वकाळ