भजनी मालिका
← भजनांकडे परत

योगि मुनि जन तपस्वी याज्ञिक । ते तव पादुका वंदिती शिरीं

yogi muni jan tapasvi yadnyik | te tav paduka vanditi shirin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
योगि मुनि जन तपस्वी याज्ञिक । ते तव पादुका वंदिती शिरीं ॥१॥ हरिहर ब्रह्मा सूर्य चंद्रादिक । ओढवी मस्तक रजरेणु ॥२॥ गंगा भांगीरथी होती शुचिमंत । आणिकांची मात काय सांगों ॥३॥ नामा म्हणे नेणों पार तुझा देवा । कृपाळु केशबा केशिराजा ॥४॥