भजनी मालिका
← भजनांकडे परत

येरे येरे माझ्या रामा । मनमोहन मेघ:श्यामा

yere yere majhya rama | manamohan megh:shyama

रचनाकार: संत नामदेव · अभंग
येरे येरे माझ्या रामा । मनमोहन मेघ:श्यामा ॥१॥ संतमिसें भेटी । देईं देईं कृपा गोष्टी ॥२॥ आमची चुकवी जन्मव्याधी । आम्हां देईं हो समाधी ॥३॥ जनी म्हणे चक्रपाणी । करीं ऐसी हो करणी ॥४॥