भजनी मालिका
← भजनांकडे परत

येईंगे माधवे पाजीं प्रेमपान्हा । विषयाचा आंदणा नको करूं

yeinge madhave pajin premapanha | vishayacha andana nako karun

रचनाकार: संत नामदेव · अभंग
येईंगे माधवे पाजीं प्रेमपान्हा । विषयाचा आंदणा नको करूं ॥१॥ धांव तूं मधुकरे माधवे उदारे । येईं तूं सोइरे जन-निये ॥२॥ कष्टलों मी भारी शीण दूर करीं । येईं तूं झडकरी माधवे वो ॥३॥ अनंत वो नामें पुराणें पढती । पावसी आकांतीं विठ्ठले वो ॥४॥ नामा ह्मणे लाहो करावा माधवे । माझेनि वो जीवें लाहे चाड ॥५॥