भजनी मालिका
← भजनांकडे परत

येइना अझुनी श्रीकृष्ण सदना । गोंवळा रक्षणा मायबाप

yeina ajhuni shrikrushna sadana | gonvala rakshana mayabap

रचनाकार: संत नामदेव · अभंग
येइना अझुनी श्रीकृष्ण सदना । गोंवळा रक्षणा मायबाप ॥१॥ लावुनि आशा फिरविशी दिशा । प्रेमभाव कैसा दावीं आतां ॥२॥ बाळेभोळे जन करिती विनंती । मोकलिसी अंतीं म्हणे नामा ॥३॥