भजनी मालिका
← भजनांकडे परत

येईं वो त्रिविक्रमे पूर्ण पान्हा देईं । कामधेनु होईं विठ्ठलराजे

yein vo trivikrame purna panha dein | kamadhenu hoin viththalaraje

रचनाकार: संत नामदेव · अभंग
येईं वो त्रिविक्रमे पूर्ण पान्हा देईं । कामधेनु होईं विठ्ठलराजे ॥१॥ त्रिविक्रम धरे येईं तूं सांवळे । मुकुंद गोपाळे के-शवे वेगीं ॥२॥ तूम माझे निजधन त्रिविक्रमधरे । गंगानाममात्रें भंगी पाप ॥३॥ त्रिपदागायत्री त्रिविक्रममुखें । जनाची वो दु:खें हरती नामें ॥४॥ त्रिजटा त्रिफणी भागीरथी वेणी । प्रयाग वो धूनी पाप जाळी ॥५॥ त्रिस्थळीं त्रिमाये त्रिविक्रम होय । विश्वेश्वर दोहे तारक ब्रह्म ॥६॥ काशीकांति माये अयोध्या द्वारका । मधुरा अवंतिका तूंचि माये ॥७॥ नामा ह्मणे माझी त्रिविक्रम गाय । मक्तिसी पान्हाये पंढरपुरीं ॥८॥