भजनी मालिका
← भजनांकडे परत

येईं तूं शारंगे वासुदेवे त्वरें । वासुदेवो सारे गोपाळ वो

yein tun sharange vasudeve tvaren | vasudevo sare gopal vo

रचनाकार: संत नामदेव · अभंग
येईं तूं शारंगे वासुदेवे त्वरें । वासुदेवो सारे गोपाळ वो ॥१॥ त्राहे वासुदेवा पावें झडकरी । त्वरें वेगू करीं आर्त भेटी ॥२॥ वासुदेवनामें साधन सुगम । योगिया विश्राम स्थान झालें ॥३॥ द्वादश अक्षर जपिन्नला धुरु । तयासी साचारू अढळपद ॥४॥ बळी भीष्मदेवीं वासुदेवीं भाव । रोहिणीची माव ऐसें झालें ॥५॥ नामा म्हणे भक्त वासुदेवीं रत । सायुज्य पावे तो एक्यानामें ॥६॥