भजनी मालिका
← भजनांकडे परत

येईं ह्लषिकेशी दिव्यरूप दिसे । मन हें उल्हासे भेटी-लागीं

yein hlashikeshi divyarup dise | man hen ulhase bheti-lagin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
येईं ह्लषिकेशी दिव्यरूप दिसे । मन हें उल्हासे भेटी-लागीं ॥१॥ ह्लषिकेशी नामें तरले संभ्रमें । नित्य रामनामें भवसिंधू ॥२॥ आराधनें धन ऋषीसीं संपूर्ण । नाम कोटी यज्ञ झाले तया ॥३॥ पावन ह्लषिकेशी हेंचि ध्यान मन । नाम सनातन ह्लषिकेशी ॥४॥ विश्वा करी कळा विश्वा जन लीळा । त्राहे वेळोवेळां ह्लषिकेशी ॥५॥ नामा म्हणे माय येईं ह्लषिकेश । झालों कासावीस तुजवीण ॥६॥