भजनी मालिका
← भजनांकडे परत

येईं गे केशवे मज तुझी सवे । तुजविण नुगवे दीन माये

yein ge keshave maj tujhi save | tujavin nugave din maye

रचनाकार: संत नामदेव · अभंग
येईं गे केशवे मज तुझी सवे । तुजविण नुगवे दीन माये ॥१॥ तूं माय जननी कांसवी कौसल्या । दिन बहुसाळ मज पावें ॥२॥ न मागें केवळ विषयाचें टवाळ । तूं माझी कृपाळ विठ्ठ-लमाय ॥३॥ वोळली गगनीम केशव कामधेनु । लवतां लोचनु स्फुरे बाह्या ॥४॥ वाजवील वाद्य गोपाळांची मांदी । आल्हाद गोविंदीं नित्य माझा ॥५॥ नामा ह्मणे केशव येई कामधेनु । तेणें माझी तनु तृप्त सदा ॥६॥