भजनी मालिका
← भजनांकडे परत

येई गे विठ्ठले अनाथाचे नाथे । माझे कुळदैवते पंढरीचे

yei ge viththale anathache nathe | majhe kuladaivate pandhariche

रचनाकार: संत नामदेव · अभंग
येई गे विठ्ठले अनाथाचे नाथे । माझे कुळदैवते पंढरीचे ॥१॥ पंच प्राणांचा उजळोनि दिपक । सुंदर श्रीमुख ओवाळीन ॥२॥ मनाचा प्रसाद तुजलागीं केला । रंगभोग आपुला घेऊनि राहे ॥३॥ आनंदाचा भोग घालिल आसनीं । वैकुंठवासिनी तुझ्य नांवें ॥४॥ आपुलें म्हण्वावें सनाथ करावें । भावें संचारावें ह्रदयांत ॥५॥ नामा म्हणे माझे पुरवी मनोरथ । देई सदोदित प्रेमकळा ॥६॥