भजनी मालिका
← भजनांकडे परत

वृषभाच्या रूपें आला रिठासूर । इंद्रादि सुरवर भीती त्यासी

vrushabhachya rupen ala rithasur | indradi suravar bhiti tyasi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वृषभाच्या रूपें आला रिठासूर । इंद्रादि सुरवर भीती त्यासी ॥१॥ बहू देतो त्रास गोकुळींच्या जना । धांवधांव कृष्णा मारी याला ॥२॥ जगजेठी तेव्हां धरितसे शिंगें । सारितसे मागें भुजाबळें ॥३॥ पाडोनियां खालीं दिल्हा पाय वर । मारिला असुर नामा म्हणे ॥४॥