भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठलाचे पाय धरूनियां राहें । मग संसार तो काय करील तुझें

viththalache pay dharuniyan rahen | mag sansar to kay karil tujhen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विठ्ठलाचे पाय धरूनियां राहें । मग संसार तो काय करील तुझें ॥१॥ संसाराचें भय नाहीम हरिचे दासा । विठु आह्मां सरिसा निरंतर ॥२॥ निरंतर वसे हरि भक्तापासीं । विसंबेना त्यासी कदाकाळीं ॥३॥ नामा ह्मणे ऐसा विठ्ठल सोडोनी । व्यर्थ काय जनीं शिणताती