भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठाल विसांवा सकळिकां । विठ्ठाल आधार तिही लोकां । विठ्ठाल नकळे ब्रह्मांदिकां । विठ्ठाल रेखा पंढरीये

viththal visanva sakalikan | viththal adhar tihi lokan | viththal nakale brahmandikan | viththal rekha pandhariye

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विठ्ठाल विसांवा सकळिकां । विठ्ठाल आधार तिही लोकां । विठ्ठाल नकळे ब्रह्मांदिकां । विठ्ठाल रेखा पंढरीये ॥१॥ विठ्ठाल डोळस सांवळा । विठ्ठाल धरारे मानसीं । विठ्ठाल सोडवील अहर्निशीं । विठ्ठालावीण मुक्ति कैंची । कुंटणी गणिकेसी उद्धरिलें ॥३॥ विठ्ठाल उभा भीमातिरीं । कर ठेवूनि कटावरी । विठ्ठाल भक्ताकाज कैवारी । विठ्ठाल हरी महादोष ॥४॥ विठ्ठाल अनाथ कोंवसा । विठ्ठाल नुपेक्षी भरवंस। विठ्ठालेंविण शून्य दाही दिशा । विठ्ठालविण नाहीं हे अनेक ॥५॥ श्रीविठ्ठल भक्तीरस । श्रीविठ्ठल परम पुरुष । विष्णुदास ह्मणे नामा ॥६॥