भजनी मालिका
← भजनांकडे परत

विश्वंभर नाम तुझें कमळापती । जगीं श्रुति स्मृति वाखाणिती

vishvambhar nam tujhen kamalapati | jagin shruti smruti vakhaniti

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विश्वंभर नाम तुझें कमळापती । जगीं श्रुति स्मृति वाखाणिती ॥१॥ गौळियां घरींचें दहीं लोणी चोरूनी । खातां चक्रपाणि लाजसी ना ॥२॥ आतां दीनानाथा तुझें ब्रीद साचें । तरी भूषण आमुचें जतन करीं ॥३॥ येर ठेवाठेवी कायसी आतां । तुम्हां विनवितो नामा केशिराजा ॥४॥