भजनी मालिका
← भजनांकडे परत

विष्णूसी भजला शिव दूराविला । अध:पात झाला तया नरा

vishnusi bhajala shiv duravila | adh:pat jhala taya nara

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विष्णूसी भजला शिव दूराविला । अध:पात झाला तया नरा ॥१॥ शिवपूजा करी विष्णूसी अव्हेरी । तया-चिये घरीं यम नांदे ॥२॥ विष्णुकथा ऐके शिवासी जो निंदी । त-यासी गोविंदा ठाव नाहीं ॥३॥ नामा ह्मणे असती शिवविष्णु एक । वेदाचा विवेक आत्माराम ॥४॥