भजनी मालिका
← भजनांकडे परत

विषयीं आसक्त जालें माझें मन । न करी तुझें ध्यान पंढरीराया

vishayin asakta jalen majhen man | na kari tujhen dhyan pandhariraya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विषयीं आसक्त जालें माझें मन । न करी तुझें ध्यान पंढरीराया ॥१॥ नाथिले संकल्प करी नानाविध । तेणें थोर खेद पावतसे ॥२॥ आयुष्य सरे परी न सरे कल्पना । भोगावी यातना नानाविध ॥३॥ जन्म मरण कष्ट भोगितां संकटीं । होतसे हिंपुटीं येरझारीं ॥४॥ ऐसा मी अपराधी दुराचारी देवा । भेटसी केशवा कवणेपरी ॥५॥ मायामोहें सदा भ्रांत माझें चित्त । चुकलें निजहित नारायणा ॥६॥ तूं अनाथा कैवारी ब्रीदावळी हरी । सोडवी मुरारी म्हणे नामा ॥७॥