भजनी मालिका
← भजनांकडे परत

विषयांचे कोड कां करिसी गोड । होईल तुज जोड इंद्रियबाधा

vishayanche kod kan karisi god | hoil tuj jod indriyabadha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विषयांचे कोड कां करिसी गोड । होईल तुज जोड इंद्रियबाधा ॥१॥ सर्व हें लटिकें जाणूनि तूं निकें । रामेंविण एके न सुटिजे ॥२॥ मायाजाळमोहो इद्रियांचा रोहो । परि न धरिसी भावो भजनपंथें ॥३॥ नामा ह्मणे देवा करी तूं लवलाहो । मयूरचा टाहो घन गर्जे ॥४॥