भजनी मालिका
← भजनांकडे परत

विषय तडातोडी करि माझे मन । राहिलें म्हणोन तुझे पाइं

vishay tadatodi kari majhe man | rahilen mhanon tujhe pain

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विषय तडातोडी करि माझे मन । राहिलें म्हणोन तुझे पाइं ॥१॥ नको नको देवा वासनेचा संग । मज आला दुभंग नारायणा ॥२॥ कामक्रोधलोभ वैरि पाठी लागियेती । झणीं त्याचे हाति देसी मज ॥३॥ नामा म्हणे होसि अनाथ कोंवसा । ब्रिदें जगदिशा वर्णिताती ॥४॥