भजनी मालिका
← भजनांकडे परत

विषय सेवितां तुज । नव्हे पुढील काज । कदा न भेटे तुज । गरुडध्वज निश्चयेंसी

vishay sevitan tuj | navhe pudhil kaj | kada na bhete tuj | garudadhvaj nishchayensi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विषय सेवितां तुज । नव्हे पुढील काज । कदा न भेटे तुज । गरुडध्वज निश्चयेंसी ॥१॥ काय करिसी खटपत । वांयां मार्ग दुर्घट । वरपडा होसील कष्ट । परि संसार न सुटेचि ॥२॥ सुट-केचें मूळ जाण । रामकृष्ण नारायण । येणें तुटेल भवबंधन । जन्मा न येसी सर्वथा ॥३॥ साधन इतुकेंचि पुरे । न लगती मंत्रांचे भार । ते बुडविती साचार । परि तरों न देती ॥४॥ नामा म्हणे ते पामर । नेणतीच हा मार्ग सार । परि वाचे नाहीं उच्चार । तो जाणावा महादोषी ॥५॥