भजनी मालिका
← भजनांकडे परत

विसावा विठ्ठल सुखाची साउली । प्रेमपान्हा घाली भक्तांवरी

visava viththal sukhachi sauli | premapanha ghali bhaktanvari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विसावा विठ्ठल सुखाची साउली । प्रेमपान्हा घाली भक्तांवरी ॥१॥ दाखवी चरण दाखवी चरण । दाखवी चरण नारायणा ॥२॥ विठठल आचार विठठल विचार । दावीं निरंतर पाय आतां ॥३॥ नामा म्हणे नित्य बुडालों संसारीं । धांवोनियां धरीं हातीं मज ॥४॥